Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

"पोलिसातला माणूस...निराधार रुग्णाला घाटकोपर पोलिसांची मदत !

निलेश मोरे ( घाटकोपर )


घाटकोपर ( प ) नित्यानंदनगर विभागातील समर्थ चंद्रशेखर चाळीतील एक भाडेकरू रहिवाशी सूरेश यादव वय 45 वर्षे, हा रिक्षाचालक गेली अनेक काळ क्षयरोगाची लागण झाल्यामुळे औषधोपचार घेत होता. त्याचे कुटुंब गावी असल्याने त्याचे औषधोपचारावर दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचा आजारही बळावला होता. दरम्यान, गेली आठ दिवस सूरेश यादव हा चिंताजनक अवस्थेत परिसरात दिसत असे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व अफवामुळे त्याच्याकडे इतर लोकही दुर्लक्ष करीत असत. मात्र दि.29 एप्रिल रोजी रात्री 8 च्या दरम्यान सूरेश यादव हा अक्षरशः जमिनीवर कोसळला. हे पाहून स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम, रमेश चंदनशिवे, सुरेश कु-हे, अरूण महातो, जावेद, यांनी सदर गंभीर बाब स्थानिक पोलीस बीट क्र.3 चे  सहा.पो.निरीक्षक किरण खरात यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून सांगितली . त्यांनी त्वरीत दखल घेवून पो.ह.धुम व पो.शि.तडवी यांना घटनास्थळी पाठविले. त्याचवेळी उपरोक्त सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई पोलीसांच्या मुख्य कार्यालयात संपर्क करून या बाबत तक्रार केल्यानंतर सपोनि. किरण खरात यांच्या मार्गदर्शनानुसार 108  क्रमांकावरून तातडीचे सहकार्य मिळाल्याने राजावाडी रूग्णालयाने तातडीने रूग्णवाहिका पाठविली. दरम्यान, यावेळी पो.ह.धुम व पो.शि.तडवी यांनी तातडीने रूग्ण सूरेश यादव याला राजावाडी रूगणालयात दाखल करण्यासाठी पदरमोड करून कार्यकर्त्यांना आर्थिक मदत केली.घाटकोपर पोलीसांच्या या तातडीच्या व माणुसकीच्या मदतीमुळे आज निराधार सुरेश यादववर यशस्वी उपचार सुरु असल्याचे येथील कार्यकर्त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया ,

किरण खरात ( सहायक पोलिस निरीक्षक ) कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात असलेला लॉकडाऊन मध्ये विविध आजाराने त्रस्त असलेले रुग्ण यांची काळजी घेणे गरजेचे आहे .. अशा रुग्णांकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा अथवा पोलिसांना कळवावे .

फोटो : सहायक पोलिस निरीक्षक , किरण खरात ( घाटकोपर पोलीस ठाणे )
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: