घाटकोपर ( निलेश मोरे ) देशात वाढत असणारा कोरोनाचा संसर्ग आता शेवटच्या टप्या पर्यंत येऊन ठेपला आहे . झोपडपट्टी बहुल भागात कोरोना हळूहळू शिरकाव करत असल्याने नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण उभे राहत असल्याचे चित्र समोर येत आहे . नागरिकां मधील ही भीती दूर सारण्यासाठी तसेच वेळीच फुफ्फुसाचा त्रास असणाऱ्याना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कोव्हीड 19 महाराष्ट्र टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रभाग क्रमांक 127 चे नगरसेवक सुरेश पाटील यांनी विभागातील 18 ते 55 व 55 वयोगटापुढील नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी तापसण्याकरिता पल्स ऑक्सिमीटर या यंत्राद्वारे आज दि 30 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली . झोपडपट्टी परिसर असणाऱ्या रामनगर ( अ ) दत्तात्रय नगर , सिद्धार्थ नगर अशा परिसरात नागरिकांची तपासणी करण्यात आली . यावेळी पालिकेचे आरोग्यसेवक यांच्या साहाय्याने तपासणी अभियान घेण्यात आले . या यंत्राद्वारे ज्यांची ऑक्सिजण पातळी 94 पॉईंटच्या खाली आहे ( कमी आहे ) त्यांना कोरोना सेंटरवर नेऊन उपचार वेळीच दिल्यास कोरोना बाधितांचा आकडा कमी व्हायला मदत होईल असे नगरसेवक सुरेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले .
फोटो : पल्स ऑक्सिमीटर यंत्राद्वारे आज घाटकोपर मध्ये नागरिकांची तपासणी करताना . छायाचित्र : निलेश मोरे
फोटो : पल्स ऑक्सिमीटर यंत्राद्वारे आज घाटकोपर मध्ये नागरिकांची तपासणी करताना . छायाचित्र : निलेश मोरे