जिल्हा परिषद सदस्य वृषालीताई शेवाळे यांचा मदतीचा हात
ठाणे:नॅशनल युनियन जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीनेकरोना विषाणेमुळे निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीची झळ सर्वसाधारण नागरिकांसह प्रसारमाध्यमकर्मीनाही तितकीच भेडसावत आहे. वर्तमान आणि उद्याचा येणारा काळ कठीण असणार DEMO PHOTO आहे. सर्वांनी एकमेकांना सहकार्य करुन आधार देणेची गरज आहे. नवी दिल्लीतील एनयुजे इंडियाशी संलग्न असलेल्या नँशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्षा, शीतलताई करदेकर च्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार,महाराष्ट्रातील गरजू नागरिकांना मदतीसाठी समन्वय करणेचे काम सुरु आहे
तसेच प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यातील गरजू पत्रकारांना सर्वतोपरी मदत देण्याचे काम एनयुजेएम चे जिल्हा समन्वयक व पदाधिकारी याच्या मार्फत केले जात आहे.
त्याच अनुशंगाने ठाणे जिल्ह्यातील एनयुजेएमच्या पत्रकारांना,ठाणे जिल्हा परिषद सदस्य वृषालीताई विलास शेवाळे यांच्या पुढाकाराने व त्यांच्याच अखत्यायारीत असलेल्या श्रमसाफल्य सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था (मर्यादित) म्हारळ,कल्याण याच्या वतीने उल्हासनगर व कल्याण पूर्व येथील २० पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सदर सेवाभावी कामाला वरील संस्थेचे प्रमुख विलास शेवाळेसर,संस्थेचे संचालक मनोज शेवाळे,मुकेश गायकवाड यांनी सहकार्य केले.
एनयुजेमहाराष्ट्र चे ठाणे समन्वयक किरण पडवळ, सुबोध गोडांणे,बबन मनवर,सलिम मन्सूरी,अशोक कदम, संपत डोळस आदी सदस्य्यांनी नियोजीत काम पार पाडले.
यासहकार्यासाठी शीतल करदेकर यांनी वृषालीताई शेवाळें व संबंधित मान्यवरांचे आभार मानले आहेत.