Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

चांदीवली मध्ये भाजपतर्फे गरजू लोकांना 5 हजार रेशनिंग किट वाटप

घाटकोपर ( निलेश मोरे ) चांदिवली विधानसभा क्षेत्रात भाजपा राष्ट्रीय युवा मोर्चा अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा अध्यक्ष,नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या माध्यमातून करोना विषाणू विरुद्धच्या लढ्यामध्ये विभागातील गरजू लोकांसाठी मदतीचा हातपुढे केला आहे. प्रभाग क्रमांक 159 मध्ये गरजू गरीब नागरिकांना 5 हजार रेशनिग किट वाटप करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.दरम्यान चांदिवली विधानसभेतील सर्व वॉर्डमधील गरजू स्थानिक जनतेला दुपारी आणि संध्याकाळी असे दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक वॉर्ड अध्यक्ष आणि भाजपा कार्यकर्ते जेवणाची पाकिटे घरपोच करण्याचे काम केले. प्रभाग क्रमांक 159 मध्ये नगरसेवक प्रकाश मोरे यांनी आता रेशनिंग किट वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.राष्ट्रीय युवा मोर्चा अध्यक्ष, खासदार पूनम महाजन यांच्या  सौजन्याने विधानसभा अध्यक्ष नगरसेवक प्रकाश देवजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली 5 हजार रेशनिंग किट (अन्नधान्य ) वाटपाचा संकल्प केला आहे. भाजपा कार्यकर्ते लोकांच्या घरी जाऊन कुपन वाटत आहेत. या कूपनमध्ये सर्व माहिती भरून घेतली जात असून कुपन देऊन रेशनिंग किट चे वाटप करण्यात येत असताना समाजसेविका उषा मोरे या सुद्धा सहभागी होऊन सहकार्य करीत आहेत. भाजपा तालुका अध्यक्ष नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या या उपक्रमाला गरीब गरजू लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून अन्नधन्य  वाटप केल्या बद्दल गरजू लोकांनी मोरे यांचे आभार मानले.
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: