घाटकोपरच्या न्यु दयासागर येथील कोरोनामुक्त युवकाचे टाळ्या वाजवून स्वागत
घाटकोपर ( निलेश मोरे ) देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे तर दुसरीकडे कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसते आहे . दोन दिवसांपूर्वी घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील माता महाकाली मंदिर येथील एक युवती कोरोनामुक्त होऊन घरी परतली .या युवतीचेही रहिवाशांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत करण्यात आले होते तर सोमवारी न्यु दयासागर येथे राहणारा युवक कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतला . 29 मार्च रोजी सदर युवक हा कोरोना पॉझिटिव्ह होता . उपचारासाठी त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते . डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्या नंतर युवक पूर्ण बरा होऊन कोरोनामुक्त झाला .त्याला सोमवारी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला . स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांनी या युवकाला रुग्णालयात दाखल झाल्या पासून ते डिस्चार्ज मिळे पर्यंत संपूर्ण धीराची भूमिका घेतली . सोमवारी युवक घरी परतताच रहिवाशी व नगरसेवक सुरेश पाटील यांनी त्याची चालत घरा पर्यंत टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले . यावेळी युवकाने प्रतिक्रिया देताना नगरसेवक पाटील यांचे आभार मानत मी कोरोनाला हरवून आलो असल्याची प्रतिक्रिया दिली . सुरुवातीला खूप घाबरलो होतो पण डॉक्टर , नर्स पूर्ण प्रयत्न करत होते . काही दिवस कुटुंबा पासून विभक्त असल्याने त्यांना परत भेटता येईल का याची चिंता होती .धीर सोडायचा नाही , आतून मी खंबीर राहिलो आणि उपचाराला योग्य साथ दिली. आज सुरक्षित होऊन परतलो . कोरोनाला कुणीही घाबरू नका , धीराने राहा , डॉक्टर , कर्मचारी सर्वजण आपल्याला वाचवण्यासाठी झटत आहेत .