घाटकोपर ( निलेश मोरे ) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून दररोज रस्त्याची सफाई व निर्जंतुकीकरण करणे सुरू आहे . कोरोना संसर्गाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे . संसर्गाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे . झोपडपट्टी , इमारती व रुग्णालयातील कचऱ्याचे विघटन करून त्याचे दररोज निर्जंतुकीकरण केले जात आहे . क्वारंटाईन झोन मध्ये पालिका सध्या विशेष लक्ष देत आहे . या झोन मध्ये साठणार ओला व सुका कचरा हा त्या झोन मधील नागरिकांसाठी चिंतेचा प्रश्न होता मात्र यावर पालिकेने तोडगा शोधत क्वारंटाईन असलेल्या इमारती व रुग्णालय येथे सुका व ओला कचरा वाहून नेण्यासाठी दोन विशेष गाड्याची सोय करण्यात आली आहे . येथील कचरा उचलण्यापूर्वी गाड्यांची सोडियम हायड्रोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करून त्यानंतर कचऱ्याचे दोन भाग करत गाड्या मध्ये भरला जात आहे . एन वार्ड पालिकेच्या घन कचरा विभागाचे सहायक अभियंता इरफान काझी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे सफाई कर्मचारी हे क्वारंटाईन असलेल्या भागात विशेष काळजी घेत आहेत . राजावाडी रुग्णालय , मुक्ताबाई रुग्णालय , नीलकंठ इमारत या क्वारंटाईन भागात कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात आले आहे . तसेच क्वारंटाईन वाहन असे फलक गाडीला लावण्यात आले आहे . क्वारंटाईन फलक असलेल्या गाड्या या त्या झोन मध्ये गेल्या नंतर त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते , गाड्या मध्ये कचरा भरला नंतर देखील दुसऱ्यादा पुन्हा त्यावर फवारणी करून या गाड्या देवनार क्षेपणभूमीत या कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे . क्वारंटाईन झोन मधील कचऱ्याची योग्य विल्हेवाट पालिकेकडू होत आहे . याबाबत प्रतिक्रिया देताना सहायक अभियंता इरफान काझी म्हणाले की ज्या ज्या विभाग क्वारंटाईन करण्यात आले आहेत त्या भागातील कचरा त्याचे दोन भाग करून आम्ही त्याची विल्हेवाट लावतो आहोत . कचरा उचलण्यापूर्वी गाड्यांचे आम्ही निर्जंतुकीकरण करतो , व कचरा गाडीत भरल्या नंतर असे दोनदा त्यावर त्या प्रक्रिया करतो व गाडी थेट देवनार क्षेपनभूमीकडे नेत त्याचे तिथेच विल्हेवाट लावून टाकतो . कर्मचाऱ्याची देखील आम्ही विशेष काळजी घेत आहोत . सफाई नंतर त्यांचे ही निर्जंतुकीकरण करून देण्यात आलेले पीपीई हे वोशेबल असल्याने ते रोज धुवून कर्मचाऱ्यांना वापरण्यास देतो .
क्वारंटाईन झोन मधील पालिकेची व्यवस्था
1 ) क्वारंटाईन झोन मध्ये पालिकेने दोन विशेष गाड्या कचरा उचलण्यासाठी व्यवस्था केली आहे . त्यावर क्वारंटाईन वाहन असे फलक लावण्यात आले आहे .
2 ) कचरा गाडीवर कार्यरत असणाऱ्या कामगारांना पीपीई किट व आवश्यक सुरक्षा साधने देण्यात आले आहेत .
3 ) कचरा गाड्यामध्ये जमा केल्यानंतर त्यावर निर्जंतुकीकरण केले जाते .
4 ) कर्मचाऱ्यानी वापरलेले पीपीई किट रोज धुवून घेतले जात आहे .
5 ) क्वारंटाईन मधला कचरा दररोज क्षेपनभूमीत नेऊन त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे .
फोटो : क्वारंटाईन झोन मधील कचरा उचलण्यासाठी एन वार्ड पालिकेने विशेष दोन गाड्याची व्यवस्था केली आहे . त्यावर दररोज निर्जंतुकीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे . तर सफाई कर्मचाऱ्याचे देखील निर्जंतुकीकरण केले जात आहे . छायाचित्र : निलेश मोरे
[21:03, 19/04/2020] Mohammed Mukim Shaikh: