घाटकोपर ( निलेश मोरे ) कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर काही पूर्णपणे बरे होऊन घरी देखील परतत आहे .घाटकोपरच्या भटवाडी भागातील महाकाली परिसरात राहणाऱ्या युवतीला कोरोनाची लागण झाली होती . डॉक्टरांनी चेक केल्या नंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता . तिच्या संपर्कात आलेल्या घरच्या सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले तर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या युवतीला चांदीवलीतील एमसीएमसीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . 14 दिवसा नंतर डॉक्टरांनी पुन्हा चेक केल्या नंतर युवतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला . निगेटिव्ह रिपोर्ट पाहुन डॉक्टरांनी युवतीला घरी जाण्यास सांगितले . मात्र कोरोनाची लागण आणि लोकांमध्ये असलेली मानसिकता यामुळे युवती पूर्णपणे नैराशेत होती . लोक कोणत्या भावनेने बघतील याची चिंता लागून असलेल्या युवतीला कल्पना ही नव्हती की घरी परतताच आपल्या सोसायटीतील रहिवाशी , माजी नगरसेवक आपले टाळ्या वाजवून स्वागत करतील . युवती भटवाडीतील मातामहाकाली या तिच्या घरी परतत असताना स्थानिक माजी नगरसेवक दिपक हांडे यांच्यासह रहिवाशी यांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत केले व तिला धीर दिला . सध्या या युवतीला डॉक्टरांनी 14 दिवस काळजी म्हणून क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे . याबाबत या युवतीने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले कोरोना या माहामारीशी सगळे देश लढत आहे . हा संसर्ग कधीही कुणालाही होऊ शकतो त्यामुळे सर्व नियमांचे पालन करत असताना कोरोना रुग्णाच्या बाबतीत लोकांनी द्वेषाची भूमिका बदलायला हवी . बरेच रुग्ण या सांसर्गतून बरे होत आहे . मी सुद्धा खचले होते पण लोकांनी टाळ्या वाजवून ज्या पद्धतीने माझे स्वागत केले त्यामुळे पुन्हा नवे आयुष्य जगण्याची उर्मी आली आहे .
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतलेल्या युवतीचे रहिवाशांनी टाळ्या वाजवून केले स्वागत