Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

वेळणेश्वर जि.प. गटातील ग्रामपंचायतींना सॅनिटायझरचे वाटप

घाटकोपर ( निलेश मोरे ) देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे . ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे . वेळणेश्वर जि.प ग्रामपंचायत मध्ये कोरोना रोखण्यासाठी एका युवकाने पुढाकार घेत पंचायत मधील चिंद्रावळे , उमराठ , हेदवी , साखरी , आगर , वेळणेश्वर , पिंपर , शिर , कूटगिरी , पाभरे , कोटळूक , सुरल , झोम्बडी , देवघर या 14 गावात कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर , मास्कचे वाटप केले . यावेळी भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे हे उपस्थित होते .हेदवी या गावचे असलेले जयेश वेल्हाळ हे तायक्वांडो प्रशिक्षक आहेत . आपल्या ग्रामपंचायतीत एकही कोरोना रुग्ण होऊ नये यासाठी जयेश वेल्हाळ हे लॉकडाऊन सुरू झाल्या पासून गावकऱ्यांची काळजी घेत आहे . तसेच कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याना कोरोना पासून स्वताच रक्षण करता यावा यासाठी त्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले . गावकऱ्यांनी काळजी घेत असताना प्रतिकार शक्ती कशी वाढवायची यावर सध्या जयेश वेल्हाळ हे मार्गदर्शन करत आहेत .
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: