Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

कोरोनावर मात करीत विक्रोळीत परिचारिकाची घर वापसी रहिवाश्यांनी टाळ्यांच्या गजरात केले स्वागत.

घाटकोपर ( निलेश मोरे ) कोरोनावर मात करीत अखेर 17 दिवसानंतर  गोदरेज हॉस्पिटलमधील परिचारिकाची घर वापसी झाली आहे त्यामुळे रहिवाश्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचे जोरदार स्वागत केले व आता पुढील 14 दिवस ती होम क्वॉरन्टाइन असणार आहे. विक्रोळीत सुद्धा आता कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना आता या संसर्गावर मात करीत घरवापसी घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे त्यातच विक्रोळी मधील गोदरेज हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या परिचारिका हिला हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करताना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे तिला पवई मधील हिरानंदानी मध्ये तिच्यावर उपचार देखील सुरू होते अखेर कोरोनावर मात करीत 17 दिवसानंतर विक्रोळी कन्नमवार नगर-2 मध्ये रहात असलेल्या घरी परतली आहे त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचे जोरदार स्वागत केले व घरातल्या सदस्यांनी तिची आर्थी ओवाळून तिचे घरात स्वागत केले हे सगळं पाहून कोरोना आजरावर मात करून घरी आलेल्या परिचारिकाच्या आश्रू अनावर झाले होते परंतु आता पुढील 14 दिवस ती होम क्वॉरन्टाइन असणार आहे.
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: