Smiley face

Technology

Breaking News

[recent][newsticker]
[recent][featured1]
[blogger]

Populars

Footer Label

चर्चित खबर

Navigation

परप्रांतीय मजुरांनी अर्ज भरण्यासाठी केली गर्दी

घाटकोपर ( निलेश मोरे ) कोरोना संकट वाढत असल्याने मुंबईतील हवालदिल झालेल्या मजूर, कामगार विद्यार्थी याना केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नियोजन पद्धतीने त्यांच्या नोंदणी जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन वैदकीय प्रमाणपत्र जोडून गावी जाण्यासाठी सोडण्यात येणार आहे मात्र याकरिता परप्रांतीय मजूर लोक अति घाई करत असून आज विक्रोळी पोलीस ठाण्यासमोर अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मुंबईत कोरोना चा प्रधुरभाव अधिक असून गेल्या दीड महिन्यापासून मुंबईतील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.हाताला काम नाही मुंबईत थांबण्यापेक्षा गाव जवळ करण्यासाठी परप्रांतीय मजूर गावी चालत व मिळेल त्या वाहनाने धोका पत्करून जात होते तर लॉक डॉवन काळात मजुरांची मुंबईत गर्दी जमल्याने शरीरिक अंतराचा फज्जा उडाला होता.या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्राने विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या असल्याने प्रत्येक जण गावी जाण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर गर्दी करत आहेत तर पोलीस या गर्दी ला कमी करण्यासाठी  त्याना अंतरावर उभे राहण्यासाठी आव्हान करीत आहेत.
Share
Banner

star news today

Post A Comment:

0 comments: